Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिस कर्मचा-याची व्यथा ; पोलिस आयुक्त साहेब.. पीएफच्या फाईलवर सही करा अन्यथा आत्महत्या करावी लागेल !

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नाशिकमुलीच लग्न जमलं आहे.. पोलिस आयुक्त साहेब.. पीएफच्या फाईलवर सही करा अन्यथा आत्महत्या करावी लागेल असा हाताश झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने कंट्रोलला फोन लावून आपली व्यथा मांडल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांचे आर्थिक गणिते कोलमडली आहेत. त्यात शाळा काॅलेजचे अॅडमिशन, मुलांचे विवाह आई
- वडील, पत्नीचे आजार आदिसह विविध समस्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांनाही आहेत. त्यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून अनेक कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात आपणास पीएफची रक्कम मिळावा, यासाठी अर्ज केले आहेत.
या दरम्यान, एका पोलिस कर्मचारी याने पीएफ मिळण्यासाठी पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने हताश झाला. त्याने अखेर निराशा होऊन शेवटी मुलीच लग्न जमलं आहे.. पोलिस आयुक्त साहेब.. पीएफच्या फाईलवर सही करा, अन्यथा आत्महत्या करावी लागेल असा, एका कर्मचाऱ्याने कंट्रोलला फोन लावल्याचा प्रकार समोर आला आहे. निदान वरिष्ठ आता तरी कर्मचारीच्या समस्या बाबत लक्ष देतील अशी अपेक्षा पोलिस कर्मचारी व्यक्त करत आहेत.
पण गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्याच्या फाईल संबंधित विभागाचे कर्मचारी वरिष्ठाच्या सहीसाठी ठेवत नसल्याने कर्मचारी हातबल झाले आहेत. यातील एका कर्मचाऱ्याने थेट कंट्रोललाच फोन करून मुलीच लग्न जमले आहे त्यासाठी पीएफ मिळावा म्हणून फाईल टाकली आहे. पण अडीच महिने झाले. फाईलवर वरिष्ठाची सही झाली नसल्याने पीएफ मिळाला नाही. त्यामुळे पीएफ मला मिळाला नाही तर मी पोलिस आयुक्तालयासमोर आत्महत्या करेन असा फोन केला. यावरून वरिष्ठांनी लक्ष घालून निदान पोलिस कर्मचाऱ्यांना आपला हक्काचा पैसा तरी मिळेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएफ कार्यालय ऑनलाईनच्या कितीही गप्पा मारत असले तरी पोलिस खात्याचा कारभाराबाबत मात्र आपला हात आखडता घेते. त्यामुळे इतर खाजगी कंपन्याच्या कर्मचारीना आपला हक्काचा पीएफ काढतांना ऑनलाईन अर्ज केला तर 48 तासात खात्यावर पैसे जमा होतात. मग पोलिस खात्याला वेगळा न्याय का ?, असा सवाल पोलिस कर्मचा-यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments