Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.च्या अडचणी व विकास कामासंदर्भात ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत बैठक


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१५- जिल्हा परिषदेच्या अडचणींबाबत व विकास कामासंदर्भात ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत बैठक झाली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज शहरात उपस्थित असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध अडचणींबाबत ना. हसन मुश्रीफ यांच्यासमवेत शासकीय विश्रागृहावर बैठक झाली. सदर बैठकीमध्ये जिल्ह्यामधील सध्या सुरू असलेल्या कोरोना या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथील मोठ्या प्रमाणात असणारे रिक्त पदे तातडीने भरणे बाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या इमारती च्या आरोग्य सुविधा बाबत अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या ॲम्बुलन्स वाहन चालका अभावी उभे आहेत पगार, वाहन दुरुस्ती इत्यादीबाबत असणाऱ्या अडचणी पालकमंत्र्यांचे समोर मांडण्यात आल्या. तसेच अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांना आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होण्यासाठी 108 क्रमांकांचे वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे बाबत मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक शाळेसाठी नवीन वर्गखोल्या व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्यामुळे काम करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने हा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात ती ३०५४ लेखाशिर्ष अंतर्गत भरीव निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अडीअडचणी बाबत राजेश टोपे, आरोग्यमंत्री यांच्याबरोबर दूरध्वनी द्वारे चर्चा करून आरोग्य मंत्री यांनी आरोग्य विभागाच्या अडीअडचणी बाबत मंत्रालय स्तारवर बैठक घेण्याचे मान्य केले त्याच बरोबर इतर विभागाच्या अडचणीबाबत संबंधित विभागाच्या मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पालकमंत्री यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून योग्य ती कारवाई करणे बाबत सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील, विधानसभेचे सदस्य आमदार रोहित दादा पवार, आमदार संग्राम जगताप आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, काँग्रेस पक्षाचे गटनेते अजय फटांगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भोर साहेब व जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments