Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरातील मानाचे गणेश उत्सव विना मंडप ; शहर विभागाचे उपअधीक्षक संदिप मिटके यांची शिष्टाईला यश

 

नगर शहरातील ग्राम दैवत श्री.विशाल गणपती मंदिर, माळीवाडा येथील बैठकीत एकमताने निर्णय

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१६- सोमवारी (दि.१०) रोजी कोतवाली पोलिस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत अहमदनगर शहरातील मानाचे श्री.गणेश उत्सव साधेपणाने व विना मंडप साजरे करण्या बाबत शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी आव्हान केले होते.
त्या अनुषंगाने रविवारी (दि.१६) नगर शहरातील ग्राम दैवत श्री.विशाल गणपती मंदिर, माळीवाडा अहमदनगर येथे येथे अहमदनगर शहरातील मानाच्या श्री.गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री आगरकर, ऋषिकेश कावरे, निलेश खरपुडे, गणेश हूच्चे ,सुनील जाधव, अनिल हुमने, मनीष साठे,रवींद्र जपे, स्वप्नील घुले,शिवाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विशाल भागानगरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील माना चे श्री.गणेश उत्सव साधे पणाने, विना मंडप व कोरो ना संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशा प्रमाणे करण्याचे एक मताने निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments