Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपा मुख्यमंत्र्यांना पाठविणार पाच हजार पत्र ; दूध दरवाढीसाठी भाजपा नगर तालुक्याच्या वतीने आंदोलन सुरूच

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२७- दुधाचे भाव कोसळल्यामुळे दूध उत्पादन शेतकरी संकटात सापडला आहे. दूध दर वाढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवला जात आहे. याचाच भाग म्हणून भाजपा नगर तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांची पत्रे पाठविणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिली.
या वेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, सरपंच विजय शेवाळे, बाबासाहेब शेवाळे, किरण धावणे, तालुका सरचिटणीस बाप्पू बेरड, भाऊसाहेब काळे, उपाध्यक्ष उमेश डोंगरे, राजेंद्र दारकुंडे, गोवर्धन शेवाळे, सागर भोपे यांच्यासह एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड मेजर, कचरू सोनार, सागर गुंड, रामदास जाधव, महेश काळे, भानुदास भगत, ऍड.सुभाष वाघ, विनायक शिंदे सर, जगन्नाथ काळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


राज्य सरकार निष्क्रिय असून भाजप सरकारच्या काळात दुधाला ३५ रुपये भाव मिळत होता, या सरकारला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नसून हे सरकार फक्त मलई घेण्यात व्यस्त असल्याची टीका यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी केली.
यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, झोपलेले सरकार जागे व्हावे आणि सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न समजावे व शेतकऱ्यांचे म्हणणे सरकार पर्यंत पोहचावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या गोठयांमध्ये जाऊन शेतकऱ्यांकडून पत्रे लिहून घेत आहोत. सदर पत्रे वाचून तरी लवकरच सरकारला जाग येवो आणि सरकार दूध दरवाढीची मागणी मान्य करो अशी अपेक्षा या वेळी कोकाटे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments