Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत शहराचा विकास आणि गाळेधारकांचे हित यांचा समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू -खा. सुजय विखे पा.

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१- कर्जत शहराच्या विकासा करत असताना तेथील व्यावसायिक हित सुद्धा जपले जाईल याची खबरदारी सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजेन व त्यासाठी प्रशासनाला साहाय्य करू अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कर्जत येथील गाळेधारकांच्या बैठकीत दिली तसेच या प्रश्न कामी सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले
कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणार्‍या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरण मध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या, उदरनिर्वाह करणार्‍या लोकांच्या रोजीरोटी जाऊ नये यासाठी बाह्यवळण रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण व आखणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रस्त्याचेसर्वेक्षण सुरू होईल व गाळेधारकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल. यासाठी कर्जत येथील गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तेथील व्यवसायकान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी खासदार विखे म्हणाले
याप्रसंगी सहाय्यक अभियंता अमित निमकर,नगर पंचायत चे मुख्य अधिकारी गोविंद जाधव,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, स्वप्नील देसाई,सचिन पोटरे,दादासाहेब सोनमाळी, अशोकराव खेडकर,काका ढेरे,अनिल गदादे,श्रीकांत तोरडमल, विनोद दळवी व गाळे धारक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments