Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता क्रांतीसेना मैदानात

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नादेंड - सरकारशी भांडून नव्हे तर सुसंवाद आणि समन्वयातून मराठा समाजाला न्याय मिळू शकेल.राजकारण असो की समाजकारण वादातून काहीच साध्य होत नाही,समन्वय ,चर्चा आणि विचार विनिमयातून मात्र असाध्य ते साध्य होऊ शकते.म्हणूनच क्रांतीसेनेने विद्यमान महाविकास आघाडी सरकार सोबत सहकार्याची भूमीका घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमीका घेतली असलेचे क्रांतीसेनेचे पक्षाध्यक्ष संतोष तांबे यांनी म्हटले आहे.

नुकतीच त्यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची नांदेड येथे भेट घेतली. यात मराठा आंदोलकांना वरील गुन्हे मागे घेणे, सारथी ला व्यवसायाभिमुख बनवणे, तालुका स्तरावर वसतिगृह देने यावर सविस्तर चर्चा होऊन लवकर अंमललबजावणी करणार असल्याचेही संतोष तांबे यांनी सांगितले. हजारो मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि आरक्षण टिकवत सारथी ला गती देणे आवश्यक असल्याचे मान्य करून त्याबाबद्दल तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आणि सरकारचा सकारात्मक प्रतिसाद असून गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनुकूल असल्याचे नामदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. 25 ऑगस्टच्या आत सर्व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांची बैठक घेऊन आरक्षण बाबत शासन आपली बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडत असल्याचेही सांगू आणि संवाद साधून समस्या सोडवू असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. याबैठकीला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्य समन्वयक तथा छावा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य सरचिटणीस नितीन देशमुख, विधी सल्लागार धनंजय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments