Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

..विकलेल्या गाडीची 'जीपीएस' ने पाळत ठेवून पुन्हा चोरी करणारी टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि,१६- सोशल मिडिया व प्रत्यक्षात महागड्या गाड्यांची स्वस्त किंमतीचे अमिष दाखवून तसेच, बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केली जाऊन त्या संबंधित विक्री केलेल्या गाडीवर जीपीएसच्या माध्यमातून लक्ष ठेवून त्याच गाड्यांची चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळी नुकताच कोतवाली पोलिसांनी पर्दफाश केला. याप्रकरणी तरबेज इक्बाल शेख (रा.कोंडवा खुर्द, पुणे), सरफराज सलिम शेख (रा.मंगळवार पेठ, पुणे), अभिजित सचिन कदम (वय १८, रा.हातमपूरा,अहमदनगर), मोहम्मद अली रईस शेख (रा.पचपीर चावडी,अहमदनगर), दानिश हुसेन शेख (रा.रविवार पेठ, पुणे ) आदि अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, मुख्य पाहिजे असणारा आरोपी अँन्थोनी उर्फ टोणी दास अर्कस्वामी (ह.मु.हैद्राबाद) हा प्रथम गहाण ठेवलेल्या महागड्या गाड्याची कमी भावात विक्री करून रोखीने पैसे घेऊन पुढील दोन महिन्यात गाडीचे पेपर व नावावर करू देऊ असे नोटरीत नमूद केले जात. महागड्या कार गाड्याची विक्री केली जात असे, यावेळी संबंधित ग्राहकास डुप्लीकेट चावी देऊन ओरिजिनल चावी स्वतः कडे ठेवत. कारला जीपीएस व मोबाईल सेन्सॉरद्वारे पुन्हा पाठलाग करून विक्री केलेल्या गाडीवर पाळत ठेवली जात. यानंतर गाडी पार्क केलेल्या ठिकाणांहून ओरिजिनल चावीचा करून गाडी चोरी केली जात. तीच गाडी पुन्हा बाजारात कमी भावात विक्री करण्यासाठी ठेवली जात होती, अशी कबुली त्यांनी दिली. ही सर्व कामे मुख्य आरोपी अर्कस्वामी यांच्या सोबत मिळून आम्ही कामकाज करतो, पोलिस कस्टडी रिमांड मध्ये असणारे मोहम्मद अली रईस शेख, दानिश हुसेन शेख यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ३९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो.नि.प्रविण लोंखडे, गुन्हे शोध पथकाचे पोसई सतिष शिरसाठ, पोना गणेश धोञे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाॅ प्रमोद लहारे, सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापूसाहेब गोरे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments