Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती.
16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफ वगळता कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. वय, मधुमेह लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. १४ जुलैला ताप आला होता, त्यानंतर निलंगा येथून त्यांना लातूरला आणले होते. पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते.
निलंगेकर यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. 

Post a Comment

0 Comments