ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव दि.१४- अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना राष्ट्रपती गुणवता पोलीस पदक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
स्वातंत्र्य दिनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव केला जातो आज निवड यादी जाहीर केली असून त्यामध्ये अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना राष्ट्रपती गुणवता पूर्ण सेवेसाठी पोलीस पदकासाठी निवड झाली आहे श्री खेडकर हे मूळ श्रीगोंदा येथील रहिवासी असून कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयात शिक्षण पुर्ण केले 1992 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भारतीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली, एक वर्ष नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकाडमी मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लोहमार्ग नागपूर, जालना, विशेष सुरक्षा शाखा पुणे, सातारा, बुलढाणा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे, बीड,स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद, औरंगाबाद ग्रामीण आदी ठिकाणी सेवा कर्ली सातारा जिल्ह्यातील कराड वाहतूक शाखा उंब्रज पोलीस स्टेशन , पाटण पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील कारकीर्द विशेष उल्लेखनीय राहिली आहे, सेवा काळात अतिशय गुंतागुंतीचे खून, दरोड्याचे गुन्हे उघडीस आणले आहेत हरिष खेडकर यांना सेवा काळात आत्ता पर्यंत 431 बक्षिसे व 45 प्रशंसनीयपत्र प्राप्त झाले आहेत त्यांच्या कामाची दखल घेतल्याने त्यांना राष्ट्रपती पोलीस गुणवत्ता पूर्ण सेवा पदक हा पुरस्कार जाहीर केला आहे श्री खेडकर यांचे नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्र अहमदनगर चे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी अभिनंदन केले आहे तर खेडकर बोधेगाव येथील प्रसिध्द वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद जाधव यांचे मेव्हणे होत त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments