Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...माजी सरपंच यांचा सावळीविहीर बु॥ ग्रामस्थांतर्फे स्वागत करून सत्कार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
शिर्डी दि.२९- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु॥ येथील माजी सरपंच रमेश पा.आगलावे व त्यांचे बंधू हे कोरोना पॉझिटिव्ह होते. परंतु दोघांची परिस्थिती ठिक होऊन सुखरुप गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी शाल घालून सत्कार करून स्वागत केले.यावेळी
राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे, सरपंच संतोष आगलावे, ग्रामसेवक खर्डे, जिजाबा आगलावे, सुभाष आगलावे, विकास जपे, माजी सरपंच सोपानराव पवार, अनिल वाघमारे, शेख सर, नवनाथ जपे, पगारे, नळेसर सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करोना या जीवघेण्या आजाराने सगळीकडे थैमान घातले असून यामध्ये अनेक संक्रमित झाले आहे. सावळीविहिर येथे बरेच रुग्ण सापडले. राहाता, शिर्डी,परिसरातही बरेच रुग्ण संक्रमित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राहाता तालुक्यातील सावळीविहिर बु येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच रमेश पा.आगलावे व त्यांचे बंधू हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांच्या कुटुंबाचीही तपासणी करण्यात आली होती. या दोन्ही भावांची तब्बेत सुधारली असून दवाखान्यातून पूर्ण तपासणी व औषधोपचार घेऊन यांनी कोरोना रोगावर मात केली आहे. पूर्णपणे बरे होऊन त्यांनी सावळीविहिर बु. सुखरुप आले. यावेळी ग्रामस्थांनी या दोन्ही भावांचे स्वागत करीत सत्कार केला.

Post a Comment

0 Comments