Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शरीरसुखाचे आमिष दाखवून लुटू करणारी टोळी अखेर जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नागपूर : लोकांना शरीरसुखाचे आमिष दाखवून तसेच फसवूण लुटणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांना पर्दफश केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.सुमित ऊर्फ दद्दू व्यंकटराव परिहार (२१), गुन्नू बाटेश्वर मंडल (२२),  आणि तुषार ऊर्फ मोनू ऊर्फ तोतल्या अशोक जगताप (१९) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रिया ऊर्फ पल्लवी ऊर्फ प्रिया ऊर्फ श्वेता रहांगडाले (२५) आणि रजत ठाकूर या दोघे फरार झाले आहेत. फिर्यादी  हा एका खासगी कंपनीत विपणन व्यवस्थापकाने याबाबत फिर्याद दिली आहे.
समजलेली माहिती अशी की, आरोपींनी संगनमत करून रिया ऊर्फ पल्लवी हिला फिर्यादीशी मैत्री करण्यास सांगितले. यानंतर त्याला शरीरसुखाचे आमिष दाखवले. त्याकरिता त्याला २१ ऑगस्टला दुपारी १.३० वाजता हिंगणा मार्गावरील राजगृहनगर येथे बोलावून घेतले. त्यानंतर रिया त्यांना आपल्यासोबत घेऊन गेली. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रिया व फिर्यादी कारमध्ये बसून असताना आरोपी तेथे पोहोचले. चाकूच्या धाकावर आरोपींनी त्याला धमकावले व त्याच्याकडून तीन हजार रुपये रोख, एटीएममधून ९० हजार रुपये असे एकूण ९३ हजार रुपये काढून घेतले. शिवाय बदनामीतून वाचण्यासाठी किंवा घरापासून माहिती लपवून ठेवण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे ८ लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर फिर्यादीने दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक रमेश हत्तीगोटे, उपनिरीक्षक विजय नेमाडे, अरविंद मोहोड, विनायक मुंढे, आशीष दुबे आणि प्रिया हिरवाणी यांनी तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Post a Comment

0 Comments