Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विशाल गणपतीची एसपी अखिलेश कुमार सिंह यांच्या हस्ते स्थापना

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२२- शहराचे ग्राम दैवत विशाल गणपतीची स्थापना शनिवारी (दि.२२) सकाळी ९ वा. अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आली. कोरोनाच्या पाश्वभुमिवर पुजारी ट्रस्टी यांच्या समवेतच पूजा झाली. ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह विश्वस्त सोशल डिस्टिंगचे नियम पाळून उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना पाश्वभुमिवर यावेळी नगरकरांना विशाल गणपती चे दर्शन मंदीरात घेता येणार नाही म्हणून मंदिर ट्रस्ट च्यावतीने भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून फेसबुक युटुब वर लाईव दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे ट्रस्ट चे अध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले आहे.
गणेशोत्सव सर्वानी नियमांचे पालन करावे घरीच राहुन सोशल मिडीया द्वारे बप्पाचे दर्शन घेऊन गणेशोत्सव साजरा करावा,अशी विनंती अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी काली आहे.

Post a Comment

0 Comments