Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपचारासाठी आलेल्या युवतीवर डाॅक्टरकडून बलात्कार

 

कोंढवा परिसरातील घटना, आरोपी डॉक्टरविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे  : पंचकर्म उपचार करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका युवतीवर डॉक्टरने वारंवार बलात्कार केल्याचा खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी  युवतीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुरेश वाडीयार असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहितीनुसार, आरोपी डॉक्टर हा पीडित युवतीचा फॅमिली डॉक्टर आहे. कोंढवा परिसरात त्याचे आयुर या नावाने क्लिनिक आहे. 20 मार्च रोजी पीडित युवती उपचारासाठी त्याच्या क्लिनिकमध्ये गेली होती.
यावेळी त्याने क्लिनिकमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून युवतीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. ही घटना क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत त्याने पीडित युवतीवर वारंवार बलात्कार केला.
दरम्यान, डॉक्टरकडून वारंवार होणाऱ्या बदनामीच्या धमकीला कंटाळून पीडित युवतीने बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दिली.
पोलिसांनी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बोराटे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments