Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयुर्वेद महाविद्यालयाला क्रीडाई संस्थेकडून ईसीजी मशीन भेट

 

शहरातील जनतेला माणुसकीचा
 ठेवा - आमदार संग्राम जगताप
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२५- आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे शंभर वर्षाच्या कारकिर्दीत आयुर्वेद कॉलेजमधून हजारो विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजाची सेवा करत आहे शेतकऱ्यांच्या मुलांची व सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील मुलांचं डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आयुर्वेदिक महाविद्यालय करत आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजामध्ये काम करणे गरजेचे आहे नगर शहरातील जनतेला माणुसकीचा वारसा लाभलेला आहे यापुढील पिढीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माणुसकीचा ठेवा जोपासावा क्रीडाई अहमदनगर संस्थेने नेहमीच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम केले आहे त्यांचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेऊन काम करावे त्यांनी आज आयुर्वेद कॉलेजला ECG ची मशीन भेट देऊन एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे प्रतिपादन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आयुर्वेदिक गुणे महाविद्यालयाला क्रीडाई संस्थेच्यावतीने ईसीजी मशीन ची भेट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष नितीन गुगळे नरेंद्र बाफना, उपाध्यक्ष अमित मुथा, राहुल लुनीय ,रसिक लुनिया, प्राचार्य डॉ प्राणिला नलगे -दिवटे, डॉ समीर होळकर, वैभव ढाकणे ,संतोष ढाकणे ,प्रशांत धलपे.
नरेंद्र बाफना म्हणाले की क्रीडा संस्थेच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक बांधिलकी जोपासले आहे ,आमदार संग्राम जगताप यांनी शहरामध्ये विकास कामाबरोबर सामाजिक बांधिलकीतून काम केले आहे त्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात पण आमदार संग्राम जगताप यांनी अनेकांना धीर व आधार दिला सर्वसामान्य कुटुंबांना अन्नधान्य तसेच किराणा सारख्या गरजू वस्तूंचे वाटप करून एक प्रकारे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी चे काम त्यांनी पूर्ण केले.

Post a Comment

0 Comments