Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर विद्यालयात ऑनलाईन ध्वजारोहण

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
पाथर्डी दि.१५ - '७४ वा स्वातंत्र्य दिन श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर विद्यालयात नाविन्य पूर्ण उपक्रमात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन उत्साही वातावरणात 'स्वातंत्र्य दिन' साजरा करण्यात आला.
जगाला कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा विळखा बसलेला आहे. या कारणामुळेच आपल्याला आजचा स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अनुपस्थिती साजरा करावा लागला. या परिस्थितीवर मात करून विद्यालयातील मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या परिस्थितीवर मात करत सर्व विद्यार्थ्याना या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित ठेवत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
'जहाँ डाल डाल पर सोने की चिडियां करती हे बसेरा,
वो भारत देश है मेरा,
वो भारत देश है मेरा...!'
या दोन गोड कडव्याना गुणगुणत आज विद्यालयातील जवळ जवळ सर्वच विद्यार्थी आजच्या या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिलीप भांडकर, प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँकेचे व्यवस्थापक रवींद्र टोगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले आदिसह विद्यालयाचे सहशिक्षककवृंद सोनाली सोनवणे, प्रविणा गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, आत्माराम साबळे, सोनाली सराफ, मनीषा बोरुडे, वैशाली घायाळ, सुरज आव्हाड शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा होनमणे, अनिकेत झेंड आदी उपस्थित होते.
दरम्यान, ऑनलाईन ध्वजारोहनाच्या कार्यक्रमासाठी Google Meet या भारतीय अप चा उपयोग करून तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने Google Meet ची लिंक पाठवून काही वेळात सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहून राष्ट्रीय ध्वजास ऑनलाईन उपस्थितीत मानवंदना दिली. 

Post a Comment

0 Comments