Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विखेंचा नातू बिबट्याच्या तावडीतून बचावले

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांना काल आला. खा.सुजय विखे यांची सहा वर्षाची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षाचा चिरंजीव जयवर्धन हे बिबट्याच्या तावडीतून दुपारी थोडक्यात बचावले. त्यांच्यापासून अवघ्या पाच फुटांवर कुत्र्याची शिकार करून बिबट्या उसाच्या फडात  पळून  गेला.
शालिनी विखे पाटील काल दुपारी अडीचच्या सुमारास लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत असताना हा प्रकार घडला. डोळ्याची पापणी लवते न लवते, तोच उसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. तिघांपासून अवघ्या पाच फुटांवरील कुत्र्याला जबड्यात पकडून तो क्षणात उसात दिसेनासा झाला.
घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच आजूबाजूचे लोक गोळा झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांनीही शेताकडे धाव घेतली. ह्या घटनेमुळे वनाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. उसाच्या फडाभोवती दोन पिंजरे लावून त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments