ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गाव गर्भगिरी पर्वत रांगेच्या पायथ्याशी असुन 2500 फुट उंच पर्वतावर कोल्हुबाई मातेचा गड प्रसिद्ध आहे. या गडावरच भगवान शंकराचे उद्धभुत मंदीर आहे. महाराष्ट्र राज्यतील हे एक वेगळच मंदीर आहे या ठिकाणी महादेवाची उंचावर असून नंदी भगवान खाली आहे बाकीच्या मंदीरात महादेवाची पिंडीच्या उंची पेक्षा नंदी भगवान ची उंची ज्यादा असते. उंच पर्वतावरील मंदीर बाजुने पर्वत रांगा निर्सगरम्य ठिकाण नवसाला पावणारे देवस्थान म्हणून कोल्हुबाई गड प्रसिद्ध आहे. याच गडावर जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगर जय हिंद वृक्ष बँक च्या माध्यामातून गर्भगिरी 'वडराई' राष्ट्रीय वृक्ष वडाची 500झाडे महादेवाच्या पिंडीच्या आकारात वृक्षारोपण केले वटवृक्ष हे 10 फुटापेक्षा उंच असल्याने व 2510फुट लांबी ची वडाच्या झाडापासुन बनवलेली पिंड असल्याने हा गड महाराष्ट्र राज्यातील एक सुप्रसिद्ध गड व वडाच गाव व तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र बनले आहे सघ्या श्रावण महीना चालु असून या गडावर भक्तांची संख्या वाढत आहे अहमदनगर वरून 25 की मी जेऊर वरून 12किमी आगडगाव येथून फक्त 6 की मी अंतरावर कोल्हार गाव आहे. आपण या गडावर येऊन कोल्हुबाई माता महादेव भगवान चे दर्शन घेउन तृप्त व्हावे व निर्सगाचा आनंद घ्यावा असे, आव्हान सरपंच शिवाजी पालवे, जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अॅड संदिप जावळे, पोपट पालवे, मदन पालवे, शंकर डमाळे, आजिनाथ पालवे यांनी केले.
0 Comments