Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पा. यांची बदली होणार !


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नाशिक : गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून वचक निर्माण करणारे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची बदली होणार असल्याची चर्चा सध्या पोलिसांमध्ये सुरु झाली आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी कुठे अथवा केव्हा बदली होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.
विश्वास नांगरे पाटील यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. नाशिकचे तत्कालिन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या जागी नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्याआधी नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये कोरोनाचं मोठं संकट असतानाही, कायदा सुव्यवस्था राखण्यात नांगरे पाटील यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांच्या बदलीला स्थगिती मिळते की त्यांना पदोन्नती मिळून मुंबईत त्यांची सहआयुक्तपदी बदली होते याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत.
महाराष्ट्रातील तरुणांचे रोल मॉडेल आणि पोलिस सेवेतील धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून परिचित असलेले विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरुड हे त्यांचे मूळ गाव. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता. म्हणून आजही त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतात. स्पर्धा परीक्षा करुन पोलिस सेवेत येऊ पाहणाऱ्यांचे विश्वास नांगरे पाटील हे रोल मॉडेल आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांनी 
आतापर्यंत भूषवलेली पदे
👉लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
👉अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
👉पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
👉मुंबई पोलीसदल उपायुक्त
👉ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
👉अप्पर(अतिरिक्त ) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
👉पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
पोलीस आयुक्त - नाशिक


Post a Comment

0 Comments