Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सचिन तांबे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.२२- जिल्ह्यातील शिर्डी येथील भाजपाचे युवा नेते सचिन तांबे यांची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड
झाली आहे.
पक्षातर्फे श्री.तांबे यांनी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केलेल्या आंदोलने, मोर्चातील सहभाग घेतला होता. या माध्यमातून भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे योगदानाची पक्षाच्या वरिष्ठांनी दखल घेतली आहे. यामुळेच सचिन तांबे यांच्यावर भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तांबे यांच्या या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा मोर्चाचे प्रभारी संजय कौडगे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आदिसह अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments