नगर रिपोर्टर
आष्टी, दि.२५- संत शेख महंमद महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजांचे गुरु होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य संपदा निर्माण केली आहे म्हणून त्यांचे साहित्य जगासमोर येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तीवसा तालुक्याचे तहसिलदार वैभव फरतारे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील वाहिरा या ठिकाणी संत शेख महंमद महाराज समाधी मंदिराच्या प्रांगणात त्यांचे जिवनचरित्र सांगणारे फलक लावण्यात आले आहेत त्यांचे अनावरण तहसीलदार फरतारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य दादासाहेब झांजे, ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज, उपसरपंच सतिषराव आटोळे, रोहिदास झांजे, कवी किसन आटोळे, दत्तोबा घोडके, शेषराव आटोळे, मोसीन शेख, आजिनाथ आटोळे, शिवाजी आटोळे, आप्पा झांजे, परमेश्वर झांजे, जयसिंग फरतारे, संतोष झांजे, हरी मेटे, अर्जुन जेधे, सोपान पगारे, प्रविण आटोळे, प्रा. संजय झांजे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना फरतारे म्हणाले की, संत शेख महंमद महाराजांनी अनेक ग्रंथ निर्मिती केली आहे पैकी काही ग्रंथ प्रकाशित आहेत तर काही अझुनही हस्तलिखीत अप्रकाशित आहेत. ती प्रकाशित करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे. संत शेख महंमद महाराजांच्या नावे लायब्ररी करण्यासाठी प्रयत्न करु. या माध्यमातून मुलांना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी बळ मिळेल. प्रत्येक घरातून एकतरी प्रशासकीय अधिकारी असला पाहिजे यासाठी मुलांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. यावेळी सतिषराव आटोळे, प्रा. दादासाहेब झांजे, ह.भ.प. मेटे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन कवी किसन आटोळे यांनी तर आभार प्रविण आटोळे यांनी मानले.
तहसीलदारपदी बढती मिळाल्याबद्दल वाहिरा ग्रामस्तांच्या वतीने वैभव फरतारे यांचा सत्कार
तहसीलदार फरतारे यांची तहसीलदारपदी बढती मिळाल्याबद्दल वाहिरा ग्रामस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले वाहिरा गावाला मोठे भौगोलिक क्षेत्रफळ लाभल्याने गतवर्षी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाल्याने पाणी साठा वाढला व पाण्याची पातळीही वाढली. गायरानात लावलेली बहुतांशी झाडे जगली याचा आनंद वाटतो. त्यामुळे आपण साहित्य आणि निसर्गच्या जवळ आलो आहोत.
0 Comments