Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी, दि.२८- तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदार मुरलीधर यादव बडे वय ७७ व त्त्यांचा मुलगा अशोक मुरलीधर बडे वय 45 हे धान्य वाटप करीत असतांना मधुकर बडे (रा.चिंचपुर पांगुळ) याने दारू पिऊन मास्क न घालता विना नंबरचे धान्य देण्याची मागणी केली.
या कारणावरून मधुकर बडे याने कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत दुकानातील रेशन वाटप मशीनची व वजन काटा याची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Post a Comment

0 Comments