Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी शहरातील सी सी टीव्ही कॅमेरा यंत्रणेचे लोकार्पण


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.१६: - शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपरिषद मार्फत नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत संपूर्ण शहरात बसवण्यात आलेल्या सी सी टीव्ही कॅमेरा यंत्रणेचा लोकार्पण सोहळा आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.
पाथर्डी पोलीस स्टेशन येथील कॅमेरेच्या नियंत्रण कक्षात हा सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील,पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,मुख्यधिकारी धनंजय कोळेकर, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, उपसभापती मनीषा वायकर यादीसह सर्व नगरसेवक मान्यवर उपस्थित होते.
या कामासाठी सुमारे 30 लक्ष रुपये खर्च आला असून हा निधी मिळवण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी विशेष पर्यंत केले. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सी सी टीव्ही कॅमेऱ्या यंत्रणेचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार असल्याचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी मत व्यक्त केले.
उपस्थितांचे नगरसेवक रमेश गोरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments