Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरिकांनी तिरंगा ध्वज प्रिंट असलेल्या मास्क चा वापर करू नये - श्रीनिवास बोज्जा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१४ - काही समाजकंटकांनी जाणून बुजून देशाचे ध्वजाचे अवमान होण्याचे दृष्ट हेतूने तिरंगा ध्वजाचे प्रिंट असलेले मास्क बाजारात आणले आहेत असे मास्क वापरून देशाच्या ध्वजाचे अवमान करू नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.
नुकतेच दोन दिवसापासून सोशल मीडिया वर तिरंगा ध्वजाचे मास्क असलेले फोटो व्हायरल होत आहेत. जर असे मास्क चा वापर नागरिकांनी केल्या नंतर त्या मास्क ला थुंकी अगर लाळ बसेल व त्यानंतर तो मास्क डस्टबिन मध्ये फेकले जाईल याचाच अर्थ या कृत्यामुळे तुमच्याकडून देशाचे ध्वजाचे अवमान होईल या करिता नागरिकांनी या मास्क चा वापर करू नये व प्रशासनाने अश्या मास्क घातलेल्या नागरिकांवर कारवाई करावी असे आवाहन श्री बोज्जा यांनी केले.
उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस असून देशातील प्रत्येक नागरिकाला या दिवसाचा अभिमान आहे. परंतु सध्याच्या कोरोना विषाणू मुळे परिस्थिती गंभीर झाली असून हा दिवस प्रत्येकाने आप आपल्या घरीच बसून साजरा करावा. विनाकारण नागरिकांनी स्वातंत्र्य दीना निमित्त भुईकोट किल्ला, के. के. रेंज, एम आय आर ची, चांद बीबी महल अश्या ठिकाणी जाऊ नये व प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटींचे पालन करावे व गर्दी मध्ये जाऊन कोरोना आजाराला आमंत्रण देऊ नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

Post a Comment

0 Comments