Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जप्त केले ४ लाख, प्रत्यक्षात दाखविले २६ हजार ! ; वारे वा पोलिस...

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सावरगाव मेंढला : नागपूर जिल्ह्यातील  जलालखेडा पोलिस ठाण्यांतर्गत वरुड-नरखेड-जलालखेडा टी पॉईंट येथील एका शेतात सुरू असलेल्या जुगारावर  शुक्रवारी (ता.२१) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास क्राईम ब्रांच नागपूर ग्रामीण पोलिस पथकाने छापा टाकला. या छाप्याच्या कारवाईत १० जुगाऱ्यांना पकडण्यात येऊन त्यांच्याकडील मोबाईल, कार, मोटरसायकल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
जप्त केलेली रोख रक्कम ही अंदाजे ४ ते ४.५० लाख होती. परंतु पंचनाम्यात मात्र केवळ २६ हजार ७८० रुपये दाखविण्यात आले. ४ लाख रुपयांची घोटाळा क्राईम ब्राॅच विभागाने केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व रक्कम पोकॉ सुनील मिश्रा याने जमा केल्याची तक्रार प्रकरणात आरोपी असलेल्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महानिरीक्षक नागपूर रेंज व पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्याकडे केली आहे. पोलिस पंचनाम्यानुसार एक कार, एक मोटरसायकल, १० मोबाईल हँडसेट, २६ हजार ७८० रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य असे ५ लाख२९हजार७८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडून चार ते साडेचार लाख रुपये सुनील मिश्रा नावाच्या कॉन्स्टेबलने जप्त केल्याचे आरोपींचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments