Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरट्याने गळ्यातला बदाम काढण्यासाठी घेतला चिमुकल्याचा जीव ; बार्शी तालुक्यातील घटना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.२३- तालुक्यातील वांगरवाडी बार्शी येथे दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन इसमानी एका घरात महिला एकटीच असल्याचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व ९ महिन्याच्या बाळाच्या गळ्यात असलेला बदाम चोरून नेल्याची घटना घडली.  बदाम सहजासहजी निघत नसल्याने जोरात हिसका दिल्याने बाळाचा जीव गेला.
याबाबतची समजलेली माहिती अशी की, वांगरवाडी (ता. बार्शी ) येथील एका घरात अश्विनी स्वानंद  तुपे ही महिला एकटी असल्याचे पाहून दोन इसमाने तिच्या घरात घुसून त्या महिलेच्या तोंडात कापडी गोळा घालून जबरदस्तीने तिच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून घेतले. तिच्या शेजारी असलेल्या सार्थक स्वानंद तुपे  या ९ महिन्याच्या चिमुकल्या बाळाच्या गळ्यातील कळ्या दोऱ्यात असलेला बदाम काढण्यासाठी दोऱ्याला जोरात ओढल्याने गळ्यास हिसका दिल्यामुळे  त्याचा जीव गेला.  बदाम घेऊन त्यांनी लगेच तेथून पळ काढला.
    सदर घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे माननीय शिवाजी जायपत्रे आपल्या सहकारी पोलिसासह हजर झाले थोड्याच वेळात पोलीस     उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे हे ही
  घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळी पंचनामा करून तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेत निरागस बालकाचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

Post a Comment

0 Comments