Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अवैध धंदे व खुलेआम होत असलेली गांजाची विक्री

  

आधी तक्रारीची दखल न घेतल्याने ॲड सुहास कांबळे यांनी कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली तक्रार ; अर्जासोबत गांजा पण पाठविला
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि,२२-  बार्शीतील रेशनिंग तांदूळ घोटाळा बाबतच्या तक्रारी चालूच आहेत त्याच बरोबर मध्यंतरी अवैध धंद्या बाबत तक्रारी ही वाढल्या होत्या आता बार्शी शहरांमध्ये व तालुक्यात खुलेआम गांजाची विक्री होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ॲड सुहास कांबळे यांनी केली होती परंतु बार्शी येथील पोलीस खात्याने त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, म्हणून ॲड  सुहास कांबळे यांनी चक्क बार्शीमधून गांजा खरेदी करून कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज रजिस्टर्ड  पोस्टाने पाठवला आहे. अर्जासोबत त्यांनी तो गांजा ही पुराव्यासाठी पाठवला आहे असे प्रतिपादन कांबळे यांनी नगर रिपोर्टरशी बोलताना केले त्यांनी यावेळी रजिस्टर्ड पोस्टा ने अर्ज पाठविलेली पावती व गांजा पाकीटाचा फोटोही दाखवला
   यासंदर्भात बोलताना कांबळे म्हणाले की, बार्शीमध्ये व तालुक्यात बऱ्याच दिवसापासून अवैध धंदे चालू आहेत मटका, दारू, गांजा, विक्री खुलेआम चालू आहे याचा तरुण पिढीने काय आदर्श घ्यावा म्हणून मी  वेळोवेळी यासंदर्भात बऱ्याच वेळा तक्रारी केल्या आहेत एवढेच नाही तर आंदोलन, उपोषण ही केलेलीआहेत तरीपण अध्याप  या प्रकरणाची कसलीही दखल घेतलेली नाही व घेत ही नाहीत म्हणून मी  विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणून अर्जासोबत गांजा ही पाठवला आहे. जर या अर्जाची ही दखल घेतली नाही तर मी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन ही करणार आहे असे ही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments