Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारात मंदिरातच फुलांनी सजवलेल्या कृत्रीम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन

 
(छाया : बबलू शेख)
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार दि.३०- येथील मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते होवून सनई चौघडयाच्या मंजुळ सुरात मंदिरातच फुलांनी सजवलेल्या कृत्रीम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.भिंगारच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली.
कोरोना कोविडचा संसर्ग पसरु नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले.याप्रसंगी मोजकेच भाविक उपस्थित होते.
ब्राह्मणगल्लीतील देशमुखवाडा गणपती मंदिरात स्वातंत्र्यसैनिकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला.तेव्हा पासून येथील मानाचा गणपती मानला जातो.येथील प्रतिष्ठापणा केलेल्या गणरायाला द्वादशीला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जातो.याप्रथेस आज ९७ वर्ष पूर्ण झाली.मात्र यंदा मंदिरातच गणरायाची पुजा आरती व लगेचच प्रतिकात्मक विसर्जन झाल्याने इतिहासात याची नोंद झाली आहे.
पुजा व विसर्जनाच्यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश मोरे.सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.यावेळी अश्विन व कार्तिक देशमुख यांनी अखिलेशकुमार यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
दरवर्षी गावातील प्रतिष्ठित,नगरसेवक,सर्वपक्षीय पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उत्थापन पुजेच्यावेळी उपस्थित असत. पुजन झाले की मानाचा गणपती फुलांनी सजवलेल्या पालखीतून विसर्जनासाठी मार्गस्थ होत.त्यानंतर गावातील व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होत.भिंगारवेस,गवळीवाडा,सदरबाजार,भिंगारबँक,दाणेगल्ली,मोमीनपुरा,पाटीलगल्ली,लोहारगल्ली,नेहरूचौक,शिवाजीचौक,सरपणगल्ली व पून्हा ब्राह्मणगल्ली मार्ग गणपती घाट येथील विहिरीत सायंकाळी सहा वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते.मात्र याप्रथेस कोरोना संसर्गामुळे खंड पडला आहे.मिरवणूका नसल्याने कार्यकर्तेंचा हिरमोड झाला आहे.
येथे गणेशोत्सवासाठी १६ मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठाना केली होती.यापैकी दुपारी दोन वाजेपर्यंत सम्राट मंडळ गवळीवाडा,समर्थ प्रतिष्ठान दाणेगल्ली,संघर्ष- मैत्री मंडळ,धनगरगल्ली,साईबाबा व्यापारी मित्र मंडळ सदरबाजार या सार्वजनिक मंडळांनी आपल्या गल्लीतच गणेशमूर्तीचे विसर्जन केले.कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षीय पदाधिकारी यांनी समजदारीची भूमिका घेतली. सर्वत्र शांततेत पण भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. यावर्ष अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केलाच नाही.
कोरोना संसर्गामुळे छावणी परिषद व कँप पोलिसांनी विसर्जन विहिरीवर जाण्यासाठी भाविकांना मनाई केली होती.घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन सजवलेले रथ ठेवण्यात आले होते.यामध्ये भाविकांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती दिल्या.त्या गणपती घाट येथील विहिरीत विसर्जन करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments