Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणेश उत्सव आणि मोहरम ला सार्वजनिक ठिकाणी परवानगी नाही . प्रशासनाच्या नियमाचे पालन करा . प्रांताधिकारी हेमंत निकम

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.२२- गणेश उत्सव व मोहरम निमित्त बार्शी नगरपालिकेमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आले गणेश उत्सव आणि मोहरम साजरा करण्यासाठी यावर्षी सार्वजनिक ठिकाणी परवानगी नाही सर्वांनी नियोजित सूचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे अशी सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी यावेळी दिली कोवीड१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत ,  गणेश उत्सव आणि मोहरम साठी सार्वजनिक ठिकाणी परवानगी देण्यात येणार नाही .  गणेश मूर्तीची स्थापना सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकून उत्सव साजरा करता येणार नाही. घरातील गणपतीची मूर्ती साधारणता दोन फुटापर्यंत असावी गणेशाचे आगमन व विसर्जन या दिवशी कोणत्याही स्वरूपाचे बँड , डॉल्बी ,  ढोल , ताशा , लेझीम ,झांज पथक , यास परवानगी मिळणार नाही गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या रोजच्या आरती मध्ये दहापेक्षा जास्त व्यक्तीना तिथे हजर राहता येणार नाही.
       आणि  " सवारी "किंवा  "पंजे " ही सार्वजनिक ठिकाणी स्थापन  करता येणार नाहीत  बँड किंवा होर्डिंग लावता येणार नाही " सवारी " व  "पंजे " याची स्थापना आणि विसर्जन जागेवरच करावे , आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या . याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर प्रकाश थोरात मदन गव्हाणे केशव घोगरे राहुल आदींनी आप आपल्या शंका-कुशंका ही उपस्थित केल्या.
      नगराध्यक्ष आसिफ भाई तांबोळी पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर भोरे तहसीलदार डी एस कुंभार मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी सपोनि शिवाजी जायपत्रे पोनी सुगावकर नगरसेवक मदन गव्हाणे प्रसाद पाटील तात्या चौधरी राहुल उपरे ,  विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments