Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात वाढले ८२ नवे रुग्ण ; सोमवारी २६३ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्जऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि,3 : जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८९० इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली.
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, संगमनेर ०२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०१ आणि जामखेड येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील ३९ रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले.
दरम्यान, आज एकूण २६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा ११३,संगमनेर ५५, राहाता १०, पाथर्डी १८,नगर ग्रा.३,श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११,
इतर जिल्हा ५

*बरे झालेली रुग्ण संख्या: ४०२५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १८९०*

*मृत्यू: ७८*

*एकूण रूग्ण संख्या: ५९९३*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)**STAY HOME STAY SAFE*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

Post a Comment

0 Comments