Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआय प्रवेश


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  अहमदनगर दि.4 :- राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया 1 ऑगस्ट, 2020 पासुन सुरु होणार आहे. प्रवेश इच्छुक उमेदवारांनी  http://admission.devt.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश पध्दती, नियमावली इत्यादी संकेतस्थळावर pdf  स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
     प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणा-या प्रवेश इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी  Maha ITI App  ची रचना करण्यात आली असून या ॲप व्दारे उमेदवारांना त्यांचा अर्ज, निवड पत्र इत्यादी कामे  करता येणार आहेत.       प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच ती स्वत: तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरणे, निश्चित करणे व ऑनलाईन शुल्क भरणे या कामासाठी उमेदवारांनी संस्थेत येण्याची आवशकता नाही. उमेदवारांनी स्वत:हा यूजर आयडी व पासवर्ल्ड जतन करुन ठेवायचा आहे.
   उमेदवारांनी त्यांचा अद्यावत मोबाईल क्रमांक प्रवेश अर्जामध्ये नोंदवावा. सोबत प्रवेशाच्या वेळी पत्रकाची प्रत. प्रवेश इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी    http://admission.devt.gov.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी. असे के. ए. जहागिरदार, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments