ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.६-:तालुक्यातील माणिकदौडी परिसरातील बोरसेवाडी गावाच्या फाट्यानजीक हॉटेल वाघजाई जवळ महिला आणि पुरुष अश्या दोन व्यक्तींची मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी इंद्रजित वाल्मिक इंगळे वय३५रा शिरोडा ता कन्नड जि औरंगाबाद ,रेखा जनार्धन उर्फ बाळासाहेब सानप वय ३०रा भगवाननगर ता पैठण जि औरंगाबाद यांचे मृतदेह असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मृतदेहाच्या बाजूला विषाची बॉटल, मोटारसायकल( एम एच १५ जी टी ४०२७ )क्रमांकाची घटनास्थळी आढळून आली असून विष प्राषण करून आत्महत्या केली आहे.प्राथमिक माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी दोन्ही मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. याघटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments