Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक ; रेशनिंगचा ३३ लाखाचा तांदूळ काळ्या बाजारात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.३  -  बार्शी तालुक्यातील कोविड १९ लाॅकडाऊनच्या  काळात शासना कडून रेशनींग ला  पुरवठा केललेला तांदूळ बार्शीतील भिमाशंकर रंगनाथ खाडे ,इतर  ईकबाल काजी , लक्षमण पटेल ,या तिघांनी मिळून बार्शी तालुक्यातला ३३ लाखाचा  रेशनींगचा ११० टन तांदुळ गोडाऊन मध्ये  साठा करून काळ्य  बाजारात विकताना पनवेल पोलिसांनी पकडला असून सदर घटनेची पनवेल पोलिसांनी ,पनवेल शहर पोलीस स्टेशन नवी मुंबई मधुन दि. १ ऑगस्ट २०२० रोजी काढलेल्या प्रेस नोट मुळे बार्शीतील महसूल खाते आणि रेशन दुकानदार व त्या घोटाळ्यात सामील असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत......
     या घटनेबाबत सविस्तर वृत्त , ३१ जुलै २०२० रोजी मा पोलिस आयुक्त परीमंडल २ पनवेल , नवी मुंबई  यानां पनवेल पोलिस ठाने हदित असलेल्या टेक केअर लाॅजिस्टिक येथील, पलक रेशन गोडाऊन मध्ये शासनाने कोविड १९ मध्ये लाॅकडाऊन काळात गोर गरीब जनतेला  पुरविण्यासाठी आनलेला रेशनींग मालाचा अवैद्य रित्या साठा करून तो काळ्या बाजारात विक्री केला जात असल्याची  गोपनीय माहीती मिळाली होती.
     पोलिस आयुक्त संजय कुमार , पोलिस सहायक आयुक्त श्री अशोक दुधे यांना सदर ठिकाणी कार्यवाही करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
    वरीष्ठाणी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर ठाण्याचे पोलिस अधिकारी ,कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मा पोलिस उपायुक्त परिमंडल २ पनवेल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे टेक केअर लाॅजिस्टीक पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊन येथे जाऊन दोन पंचा समक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपींनी रेशनींग चा तांदूळ बार्शी जिल्हा सोलापूर येथून चार कंटेनरमधून अवैध वहातूकीदव्वारे जमा करून त्यामध्ये भेसळ करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा  केल्याचे दिसून आल्याने, सदर मालाचा साठा दोन पंचा समक्ष हस्तगत केला.
      त्यामध्ये रेशनींग तांदुळाची ५० किलो वजनाची २ हजार २२० पोती वजन ११० टन ( किम्मत ३लाख ८ हजार रूपये ) त्याबरोबर अशीयनराईस लोगो असलेली १ ) फूड कार्पोरेशन आॅफ इंडिया २ ) गोवर्मेंट आॅफ पंजाब ३ ) गोवर्मेंट आॅफ हरियान  अशी नावे असलेली रिकामी पोती व २ ईलेक्ट्रि वजन काटे ही हस्तगत करण्यात आले. 
  आरोपी भिमाशंकर रंगनाथ खाडे बार्शी तर इतर ईकबाल काजी, लक्षमण पटेल यांच्या वर भोईवाडा पोलिस ठाणे मुबंई गुन्हा रजिस्टर नं १० /२००१ भादवी कलम ४२० , ४०६ , ५००, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास मा पोलिस उप आयुक्त परि २ पनवेल व मा सहायक पोलिस आयुक्त पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत हे करीत आहेत. 
     लाॅकडाऊनचया काळात सर्वत्र जिल्हा बंदी असताना ४ कंटेनर द्वारे बार्शी ते पनवेल मध्ये  रेशनींग चा तांदूळ    गेलाच कसा ?  नक्कीच यामध्ये बार्शी महसूल खाते , जिल्हा बंदी सीमेवर असनारे शासकीय कर्मचारी देखील यात  सामील  असणार असल्याची उलट सुलट चर्चा बार्शी तालुक्यात ऐकण्यास मिळत आहे. 

Post a Comment

0 Comments