Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धुळे येथे विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण ; देशभरातून पोलिसांचा निषेध

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
धुळे, दि.२७- हवालदार साहेब हा मुलगा ज्याला तुम्ही अमानुषपणे मारताय, तो ठराविक विद्यार्थ्यांसाठी लढत नाहीये, तो सर्व स्तराच्या विद्यार्थ्यांसाठी लढतोय, त्याला तुम्ही एखाद्या आतंकवादी असल्याप्रमाणे मारहाण करताय , त्याच्या मानेवर बुक्के मारताय.. ..? पोलिस आहात की गुंड...?? अरे राज्य सरकार चालकानो विद्यार्थी आहेत आतंकवादी नाहीत.., अशा प्रतिक्रिया देशभरातून उमटल्या आहेत.
धुळे पोलिसांनी राजकीय अधिकाऱ्यांचे प्यादे होऊन विध्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा जाहीर निषेध केला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट नाकारल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्र्यांचे ताफा अडविला. यावेळी क्यूआरटी पथकाने आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत अमानुषपणे मारहाण करत अटक केली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments