Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणेशोत्सव कोणताही डामडौल न करता साधेपणाने साजरा करा ; भिंगार कँम्प पोलिसांनी घेतली शांतता समिती सदस्य व गणेशोत्सव मंडळाची बैठक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार - कोरोना कोविड संक्रमणाच्या पाश्वभूमिवर यंदाचा गणेशोत्सव कोणताही डामडौल न करता अत्यंत साधेपणाने पण भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.तर काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
गावातील देशमुख सांस्कृतिक हाँल मध्ये सोशलडिस्टंशनचे नियम पाळून कँप पोलिसांनी येथील शांतता समिती सदस्य व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची गणेशोत्सवाचे निमित्ताने बैठक घेतली.यावेळी शहर विभागाचे पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी कँपचे सपोनि प्रविण पाटील ,छावणी परिषदेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके,वीज वितरण कंपनीचे अभियंता शेख,नागदेवळे व वडारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
कोरोना कोविडच्या संसर्गाने सर्वांना ग्रासले आहे.प्रत्येक गावात याची लागण झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे.
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा आहे.गल्लीत-चौकात अथवा मोकळ्या पटांगणात कोणीही मंडप उभारुन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा आरास-देखावे करणार नाहीत.विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम यास शासनाने प्रतिबंध केलेला आहे.मंडळाच्या कार्यकर्तेंच्या घरात, मोकळ्या(रिकामे) दुकानात सुरक्षितस्थळी गणेशमूर्ती स्थापन करता येईल.रोजच्या पुजा-आरतीला परिसरातील नागरिकांची गर्दी होणार नाही याची दखल कार्यकर्तेंनी घ्यायची आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.गणेशमूर्ती परिसरात कोणती अनुचित घटना व प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी त्या कार्यकर्तेंची असणार आहे.
गणपतीची प्रतिष्ठापणा व विसर्जन मिरवणुकीस परवानगी नाही.गणेशोत्सव साजरा करतांना कोणतेही वाद्य व फटाके वाजवणे, ध्वनिवर्धक लावणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
गणेशमूर्ती विसर्जनच्या दिवशी म्हणजे द्वादशी व अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या गल्लीत- चौकात तात्पुरते छोटेसे हौद तयार करून गणेशमूर्तीचे विसर्जन करावे.गणेशोत्सव साजरा करतांना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे पोलिस उपाधिक्षक मिटके यांनी सांगितले.
सार्वजनिक मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे.शासकीय नियमांचे उल्लंघन करू नये.जातीयतेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये.असे आढळून आल्यास पोलिस कडक कायदेशीर कारवाई करतील असे सपोनि पाटील यांनी सांगितले.
बैठकीत शांतता समिती सदस्य व काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवकाळात वीजपुरवठा खंडित होणार नाही.याची दखल वीज वितरण कंपनीने घ्यावी.छावणी परिषद,नागरदेवळे व वडारवाडी ग्रामपंचायतीने आपापल्या हद्दीत सर्वत्र नियमित स्वच्छता करावी.निर्जंतुक औषध फवारणी करावी.अशा सुचना यावेळी कार्यकर्तेंनी केल्या.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यास मान्यता दिली.
बैठक संपताच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे निवेदन कँप पोलिस ठाण्यात दिले.भिंगारमधील सार्वजनिक मंडळांनी देखील यंदा गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments