Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिमुकल्याची खुनी जन्मदाता आईच !

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी, दि.२८- वांगरवाडी तालुका बार्शी येथील दोन अनोळखी इसमांनी चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसून एकट्या महिलेस पाहून तोंडात कापडी गोळा घालून तिच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व  ९ महिन्याच्या चिमुकल्याचा खून मोबाईल चार्जर च्या वायरने गळा आवळून केला त्याच्या गळ्यातील बदाम काढताना दोऱ्यास हिसका दिल्याने त्याचा गळा आवळून त्याचा जीव गेला प्रत्येकाला वेगवेगळी कारणे  सांगितल्याने या घटनेचा गुंता वाढला होता. सर्वत्र  हळहळ व्यक्त करण्यात येत होती परंतू पोलीस तपासात त्या ९ महिन्याच्या चिमुकल्याची खुनी त्याची जन्मदाता आईच निघाली !


     याबाबतचा सविस्तर वृत्तान्त असा की २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी भर दिवसा वांगरवाडी येथील एका घरामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सार्थक स्वानंद तुपे या ९ महिन्याच्या बाळाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून त्याचा खून केला व त्याची आई अश्विनी शिवानंद तुपे (वय २३, रा. वांगरवाडी  ता. बार्शी) हिच्या तोंडात कापडी गोळा घालून तिचे हातपाय बांधून तिच्या गळ्यातील असलेले मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले असल्याची तक्रार मयत सार्थक चे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये  दिली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे ,यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर सदरचा गुन्हा गुंतागुंतीचा व किचकट स्वरूपाचा वाटत होता त्यानुसार तपास पथके ही तयार करून सर्वत्र सुगावा घेण्याचा प्रयत्न चालू केला होता. आजूबाजूच्या साक्षीदार यांच्याकडे ही कसून चौकशी केली परंतु कोणीच ठोस पुरावा सांगत नव्हते  शेवटी गोपनीय माहितीनुसार एका साक्षीदारास विचारले असता तोही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याच्या सांगण्याच्या हावभावावरून शंका-कुशंका वाढत गेल्या सदर गुन्हा हा कोणी केला हे जवळजवळ उघड झालं होतं परंतु या हत्येबाबतचे कारण समजत नव्हतं शेवटी मृत्त बाळाची आई अश्विनी शिवानंद तुपे (वय २३) हिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले, की मृत बालक हे सतत रडत होते. त्याच्या अगोदर चा ही एक मुलगा आहे तो दोन अडीच वर्षाचा आहे या त्रासाला कंटाळून मीच सार्थकचा मोबाईलच्या चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला आहे माझ्यावर काही येऊ नये म्हणून मीच हा चोरीचा बनाव केला होता अशी कबुली दिली आरोपी अश्विनी स्वानंद तुपे वय २३ वर्षे हिला पोलिसांनी अटक करून भा द वि  कलम ३०२ , ३९४ ,  ४५२ , नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. २६ ऑगस्ट रोजी तिला कोर्टासमोर हजर करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
   सध्याच्या कलियुगात सर्व नातेसंबंध  संपुष्टात आले आहेत केवळ आईचीच ममताच  शिल्लक राहीली होती तिच्या पण " विश्वासाला "या घटने मुळे तडा गेला असल्याचे शब्द जमलेल्या नागंरिकाकडून कानी पडत होते.

Post a Comment

0 Comments