Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बंदिस्त शेळीपालन : नियोजन व व्यवस्थापन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेतीबरोबरच शेती पूरक उद्योग केल्यास नेहमीच फायदेशीर ठरतो, कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार असा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. असे असले तरीही ह्या व्यवसायाचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केल्यास आपल्या मिळकतीत अधिक भर पडु शकते.

शेळीपालन आणि भारत:-
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांचे महत्व :-
जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.
आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.

 मांसासाठी व दूधासाठी उत्तम जातीच्या शेळ्या खालीलप्रमाणे
1. उस्मानाबादी - अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी]
2. संगमनेरी – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी व दूधासाठी]
3. सिरोही – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी व दूधासाठी]
4. बोएर – बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी]
5. सानेन - बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [दूधासाठी]
6. कोकण कन्याळ - अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी].

#) बंदीस्त शेळीपालन: -
बंदिस्त शेळीपालनाध्ये तुमच्या पारंपारिक पद्धतीने शेळ्या न फिरवता एका ठराविक ठिकाणी
त्यांच्या निवाराची सोय करून ठाणबंध पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. शेळ्यांना शेड मध्येच विशिष्ट गव्हानी करून त्यांना त्या मध्येच चारा टाकला जातो. त्यांना यामध्ये शक्यतो कसल्याही प्रकारचे दोरीने बांधले जात नाही .ठराविक जागेमध्ये कंपाउंड करून त्यांना त्यामध्ये मोकळे सोडले जाते. गोठ्यातील वातावरण , पाणी , चारा नियोजन, बसण्याची जागा या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तरच तणावमुक्त वातावरणात शेळ्यांची चांगली वाढ होईल.

बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापन :-
1)शेळीकरीता निवारा म्हणजेच शेडची उभारणी ही उत्तर - दक्षिण दिशेलाच करावी.शेडमधील वातावरण हे ताजेतवाने राहील याचा विचार करूनच शेडची उभारणी करावी.
2) प्रती शेळी किमान 250 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 4 किलो हिरवा चारा दयावा. हिरव्या चारा मध्ये मका,कडवळ,मेदी घास किंवा अजून हिरवा घास हा कुट्टी करूनच शेळ्यांना द्यावा.
तसेच शेळ्यांना शेवरी , सुबाभूळ, तुती अशाप्रकारचा हिरवा झाडपाला दिला तरी चालतो.
3) ठराविक कालावधी नंतर शेळ्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी जंताचे औषध पाजावे.
4) कळपात 20 ते 25 शेळ्यांमागे एक नर असावा
5) गाभळ शेळीची व दुभत्या शेळीची विशेष काळजी घ्यावी.
6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी.
7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळ्यांचे निरीक्षण करावे आजारी शेळ्यांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
8) शेळयांबाबत नोंदी ठेवाव्या. व्याल्याची तारीख, शेळ्या फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
9) आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
10) शेळ्यांचे ऊन–पावसापासून संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा.
11) शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी. गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. गोठ्यात हवा खेळती असावी.
12) बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यआक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी.
13) त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, भुईमूग पाला, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
14) शेळ्या आणि बोकडांची निवड
शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात.
15) एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते.
16) दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी.
17) शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे.
18) केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
19) शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत.
शक्यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी.
20) पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी.
21) दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
22)बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते.
23) शुद्ध जातीचाच बोकड शक्यतो विकत घ्यावा. त
बोकड घेताना सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत.बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्यता असते.

Post a Comment

0 Comments