Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिला पोलिस निरिक्षकासह चारजण जखमी ; शिक्रापूर येथे विचित्र अपघात

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिरूर – तालुक्यातील शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर कासारी फाट्यावर तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात महिला पोलिस निरीक्षकासह इतर चार जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत महिला पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी टेम्पो चालक कृष्णा कंकाळ विरोधात शिक्रापुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. याबाबतीत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी या अस्वस्थ वाटू लागल्याने नियंत्रण कक्षाला कळवून त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार एमएच १२ एमडब्ल्यू २१२० मधून अहमदनगर येथून पुण्याकडे घरी जात असताना. पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर जवळील कासारी फाटा येथे त्यांच्या स्विफ्ट कार गाडीला पाठीमागून एमएच१२ एसएफ ९१९७ या टेम्पो टॕक ने जोरदार धडक दिली त्यामुळे यांच्या ताब्यातील कार पुढे चाललेल्या छोटा हत्ती टेम्पो एमएच४४ यु०६४४ ला धडकली .यामध्ये छोटा हत्ती टेम्पो रस्तावर पलटी झाला तर त्यांनी तात्काळ हँड ब्रेक दाबत गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता कार गाडी रस्ता दुभाजकावर आदळून गाडीचा टायर फुटला तर पाठीमागे टेम्पो ट्रक देखील दुभाजकावर आदळला .यामध्ये पोलीस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी यांच्या हाताला मुक्का मार लागला असून टेम्पोचालक लक्ष्मण नाईक (वय २३) रुक्मिणीबाई क्षिरसागर , ओम माळवदकर,श्रावणी माळवदकर हे जखमी झाले आहे. यामध्ये स्विफ्ट डिझायर कार,छोटा हत्ती टेम्पो यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत पोलिस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी यांनी टेम्पो ट्रक चालक कृष्णा कंकाळ रा.नायगाव यांच्या विरोधात हयगयीने,निष्काळजीपणे,वाहतुकीचा नियमांकडे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवत आपघात केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments