Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बार्शी येथे भा.ज.प. तर्फे झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन ! " दार उघड उद्धवा दार उघड "

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी,दि.२९-  भारतीय जनता पार्टी , बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने सर्व धर्मीय मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था , संघटना , धर्माचार्य आणि प्रमुख  देवस्थाने या सर्वांनी एकत्र येऊन कुंभकरणा पेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी २९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी साडेनऊ वाजता भगवंत मंदिर समोर घंटानाद आंदोलन करून " दार उघड उद्धवा दार उघड " हा नारा देण्यात येणार आहे  त्यासाठी सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्व राजकीय पक्षांनी आणि  महाराष्ट्रातील सर्व भाविक जनतेने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे बार्शी शहर अध्यक्ष महावीर कदम आणि तालुका अध्यक्ष मदन दराडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments