Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचा दिलासा, रस्त्यावर फिरणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न.प.ची दैनंदिन पावती माफ ; डॉ. संतोष मुंडे यांनी केली होती मागणी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून कोरोना पार्श्वभूमीवर नगर परिषदने छोट्या व्यापाऱ्यांची पावती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. न.प.ने छोट्या व्यापाऱ्यांची पावती न घेता माफ करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले होती. या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जगासह देशात ही सर्वत्र सध्या कोरोना पार्श्वभूमीमुळे रस्त्यावरील व्यापारी भाजीपाला, फेरीवाले, लोहार, कुंभार, चांबार, नाव्ही व बारा बलुतेदार रस्त्यावर दुकान लावणारे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांची दिवस संपेपर्यंत भौवनी सुध्दा होत नाही. व्यवसाय होत नसल्यामुळे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना नगर परिषदेची दैनंदिन पावती फाडावी लागत आहे. ही पावती नगर परिषदने हाद्दीतील सर्व छोट्या व्यापाऱ्यांना दैनंदिन पावती माफ करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले होती.
दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून नगर परिषदेने छोट्या व्यापाऱ्यांची कोरोना पार्श्वभूमीवर पावती न घेता काही कालावधीसाठी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीला व कोरोना सारख्या संकटात सापडलेल्या गोरगरिबांना मदतीसाठी पुढे आल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे कलीम लेहरी, अनंत जनार्धन बोडके सुबाबाई मुंडे, गयाबाई मुंडे, शिंदे दगडू , रामकिसन आंधळे, नंदकिशोर कोरे. अनिल मस्के. मधुकर फोकणे. उत्तरेश्वर हरेगावकर. राजू कांबळे. चंद्रकला मुंडे, जयसिंग खरे, गोरख पिंपळे, शिवा खरे, बाबुराव पिंगळे, दिपक पिंपळे, मनोज कुंभारे, छोटू कुंभारे, पुनम पुसे, मुंजा माळवदे, राहुल तांबे, राजू कुंभारे, वैजनाथ सावंत, अशोक राऊत, रूपेश राऊत, अर्जुन खाडे, दत्ता खाडे, वैजनाथ राऊत, पिंटू जाधव व सर्व छोट्या व्यापाऱ्यांनी आभार मानले आहेत. तसेच नगर परिषदचे नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, गटनेते वाल्मिक (आण्णा) कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे व सर्व सदस्य यांचे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ.संतोष मुंडे यांचे ही आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments