Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून कोरोना रुग्णाची उडी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२५- शहरातील गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
हा ३२ वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. आज पहाटे त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली. तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उडी मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तोफखाना पोलिसांना घटेनची माहिती दिली असून, चौकशी सुरू आहे, गंभीर जखमी झालेल्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक असण्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments