Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लाच घेताने कोतवाल एसीबीच्या जाळ्यात


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.४- आजोबाचे शेतीस नावाची नोंद होणेसाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गोरख निवृत्ती बर्डे ( वय४८, , सजा - पोखरी, रा. मु. कान्हेर, पो. पोखरी,ता. पारनेर, जि.नगर ) असे पकडण्यात कोतवालाचे नाव आहे.
समजलेली माहिती अशी, तक्रारदार यांचे मामा, आई व मावशी यांचे वारस म्हणून तक्रारदार यांचे मयत आजोबाचे शेतीस नावाची नोंद होणेसाठी अर्ज तलाठी सजा पोखरी यांचे कडे अर्ज केला होता. परंतु वारंवार विनंती करूनही त्यांचे अर्जावर काहीही कारवाई तलाठी हे करत नव्हते. तक्रारदार यांनी पोखरी चे कोतवाल बर्डे यांचेशी संपर्क करता, कोतवाल बर्डे यांनी तक्रारदार यांचे कडे तलाठी यांचे कडून तुमचे काम करुन देतो असे सांगून त्या मोबदल्यात ३००० रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच मागणी बाबत दिलेल्या तक्रारीवरून दि. ४ ऑगस्ट रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये कोतवाल बर्डे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करुन, मंगळवारी टाकळी ढोकेश्वर येथील इंडियन ऑईल पंपाचे आवारात आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष रु ३००० लाच तक्रारदार यांचे कडून स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. अहमदनगर एसीबीचे पोलिस उप अधिशक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
श्याम पवरे, पो हवा तन्वीर शेख, पो ना प्रशांत जाधव, पोना विजय गंगुल, पो शि रविंद्र निमसे, वैभव पांढरे व चालक पो हवा हरुन शेख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.



Post a Comment

0 Comments