Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या साडेचौदा हजाराहून अधिक ; मंगळवारी ५६७ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि,२५ : जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२२८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५२, अँटीजेन चाचणीत २५९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर ०५, पारनेर ०९, राहुरी ०१, जामखेड ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २५९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३४, राहाता ३३, पाथर्डी ०६, श्रीरामपुर २०, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा ०६, श्रीगोंदा ४०, पारनेर ०५, अकोले ३८, राहुरी ०२, शेवगाव १८, कोपरगाव २४, जामखेड २२ आणि कर्जत ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ११५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८५, संगमनेर ०२, राहाता ०३, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट ०७, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगांव ०२, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५६७ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २२१, संगमनेर ४७, राहाता ३०, पाथर्डी १६, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर १६, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ०४, श्रीगोंदा ३१, पारनेर ३९, अकोले ०५, राहुरी ०१, शेवगाव ०१, कोपरगाव ५५, जामखेड ३६, कर्जत ०९, मिलिटरी हॉस्पीटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: १४५३१,
उपचार सुरू असलेले रूग्ण:३२२८, मृत्यू:२६०, एकूण रूग्ण संख्या:१८०१९
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*STAY HOME STAY SAFE*

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

Post a Comment

0 Comments