*कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती*
अहमदनगर दि. 10 - केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क व्ह्युरोद्वारे आयोजित कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत या योजनांवर आधारित फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी अभियानाचा शुभारंभ आज (सोमवारी) जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आला.
या फिरत्या प्रसिद्धी वाहनाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींची माहिती पोहोचवली जाणार आहे. याशिवाय, कोरोना प्रादुर्भावाच्या या काळात केंद्र सरकार द्वारे जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तसेच आत्मनिर्भर भारत अभियानाची माहिती ध्वनीफित तसेच चित्रस्वरुपात देण्यात येणार आहे. हे फिरते वाहन आजपासून 14 दिवस अहमदनगर शहर आणि आजुबाजूच्या परिसरात प्रचार आणि प्रसार करणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यात या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला असुन क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयांद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना व घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयाची माहिती गावागावात जाऊन देण्यात येते, जेणेकरुन सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला मिळावा हा या कार्यालयाचा मुळ उद्देश असल्याचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी सांगितले.
0 Comments