ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
हावडा : - पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात काल (रविवार) कौटुंबिक वादानंतर एका महिलेने आपल्या पतीवर चाकूने वार करुन महिलेने चाकूने पतीचं गुप्तांगच कापून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.१६) घडली.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना पंचाला पोलीस ठाण्यांतर्गत जुजारसाहा गावातील मालिकपुकूर येथे घडली आहे. दरम्यान, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
महिलेने चाकूने पतीचं गुप्तांगच कापलं, मुलांना म्हणाली. मोहसीन मलिक याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असून त्याची पत्नी मनीरा हिला अटक करण्यात आली आहे. खूनात वापरण्यात आलेले हत्यार पोलीसांनी जप्त केले आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही मानसिक रुग्ण होती आणि तिच्यावर मागील दिवसांपासून यासंबधी उपचार देखील सुरू होते. दरम्यान, या दाम्पत्यांमध्ये वारंवार जोरदार वाद देखील होत असायचे. या दाम्पत्यांच्या दोन मुलांपैकी एकाने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ते सकाळी उठले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितले की, तिच्या खोलीत जा आणि तिने काय केले ते पहा.
जेव्हा दोन्ही मुलं त्यांच्या आईच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना प्रचंड धक्काच बसला. कारण त्यांना त्यांचे वडील मृतावस्थेत दिसून आले. यावळे वडिलांचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या होता आणि जमिनीवर प्रचंड रक्त सांडले होतं. हे दृश्य पाहताच दोन्ही मुलं प्रचंड हादरुन गेले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
दरम्यान, जेव्हा पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच आरोपी महिलेला देखील अटक केली. सध्या पोलीस याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीची कसून चौकशी करत आहेत. तिने आपल्याच पतीचा निर्घृण खून का केला? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. त्याचविषयी आता पोलीस महिलेची चौकशी करत आहेत. मात्र अद्याप तरी याविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments