Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकनिष्ठेमुळेच भाजपाकडून पक्षाच्या अहमदनगर उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती : सरपंच धनंजय बडे पा.


चिंचपूर पांगुळ पंचक्रोशीतून
 सरपंच धनंजय बडे पा. यांचा नागरी सत्कार
आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर / सोमराज बडे 
पाथर्डी दि.१- आमच्या घरण्याची परंपरा एकनिष्ठेची असून, त्या एकनिष्ठेमुळेच भाजपाने पक्षाच्या अहमदनगर उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या विश्वासाला तड जाऊ न देता आपण कोणतेही हेवेदावे न ठेवता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर पक्ष वाढीसाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नवनिर्वाचित अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा सरपंच धनंजय बडे पा. यांनी केले.

भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा नुकतेच सरपंच धनंजय बडे पा. यांच्यावर सोपवून बडे पा.यांना नियुक्तीपत्र दिले. या निवडीचे औचित्य साधून चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांतर्फे सरपंच बडे पा. यांच्या नागरी सत्कारप्रसंगीच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, पंचक्रोशीतील मान्यवरांसह नागरिकांनी सरपंच बडे पा. यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक विष्णू खाडे, दादाबा सातपुते तसेच पत्रकार सोमराज बडे, तुकाराम बडे, चिंचपूर पांगुळ सोसायटीचे सचिव दगडू बडे, वडगावचे सरपंच विठ्ठल धनवे, आजिनाथ बडे, विक्रम साखरे,आण्णा अबिलढगे,अशोक बडे, बाळासाहेब ढाकणे,दरेकर ,पोपट बडे,यांच्यासह जोगेवाडी ,वडगांव, ढाकणवाडी,माणेवाडी, पिंपळगावटप्पा, या गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments