Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोधेगाव येथे भाजपातर्फे दूध दरवाढीसाठी आंदोलन

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

शेवगाव दि.१- अहमदनगर जिल्ह्यात तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि.१) भारतीय जनता पार्टी च्यावतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले.
राज्यातील आघाडी सरकारने दुधाचे दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे उत्पादन खर्च हाती येत नाही दुधाला दर वाढवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी करून रस्त्यांवर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कासम शेख, सरचिटणीस संतोष केसभट, निमंत्रित सदस्य अशोक खिळे, संदीप देशमुख, बबन घोरतळे, शिवाजी घोरतळे, दिगंबर टोके, अनिल परदेशी, पंडित मगर, अरुण भोंगळे,अशोक बाणाईत, राजू लेले, इस्माईल सय्यद, यांच्यासह शेतकरी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments