Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघे अटक


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव- बोधेगाव पाथर्डी रोडवर शिंगोरी गावानजिक विना परवाना बनावट गावठी पिस्तुल व जिवंत कडतुस बाळगल्या प्रकरणी दोघा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेवगाव पोलिसांना दि.31 जुलै रोजी पहाटे गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळताच बोधेगाव पाथर्डी रोडवर शिंगोरी गावानजीक बालाजी टेकडी जवळ लाल रंगाचा हिरो कंपनीच्या एच एफ डीलक्स मोटारसायकलवर दोन युवक नामे योगेश विष्णू गोसावी ( रा बोधेगाव ता शेवगाव), ज्ञानेश्वर मातंग (रा हातगाव) पोलिसांना पाथर्डीकडे जात असताना आढळून आले त्यांचा जवळ विना परवाना एक गावठी बनावट पिस्टल व एक जिवंत काडतुसे आढळून आल्याने आर्म ऑक्ट प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदरची ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार, अप्पर अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी
मंदार जावळे यांच्या सूचनेनुसार पोकॉ. चंद्रकांत कुसारे, ज्ञानेश्वर इलग, वसंत फुलमाळी,संदीप चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments