Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे - थोपटेवाडी गावातील एका घटनेनं खेड तालुका हादरला आहे. गावातील धरणाजवळच्या झाडीत एका तरूणीचा विवस्त्र अवस्थेतला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी संशयित म्हणून चौघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता या निर्घृण हत्येचं गूढ उलगडलं आहे.

थोपटेवाडी या गावातील आरती सोपान कलवडे नावाच्या तरूणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेचा तपास केला असता चाकण पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. नात्यातीलच एका मुलाने एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून केल्याची कबूली दिली आहे.
हा अल्पवयीन मुलगा युवतीवर एकतर्फी प्रेम करत असे. मात्र या तरूणाने वारंवार विचारूनही आरतीनं त्याला नकार दिला. याचाच राग मनात धरून या अल्पवयीन तरूणानं युवतीची हत्या करून तीचा मृतदेह धरणाजवळच्या झाडीत फेकून दिला.
दरम्यान, या घटनेचा चाकण पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत होता. घटनास्थळी तरूणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्यानं परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं. मात्र मारेकरी नात्यातीलच व्यक्ती निघाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments