Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनसेच्या पाठ पुरवठ्याला यश शहर व जिल्ह्यात 39 हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळणार मोफत उपचार - नितीन भुतारे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१९- महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीनेघ यांना निवेदन पाठवून जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुरु करा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती त्याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली व 14 ऑगस्ट च्या दिवशी आदेश काढून शहरातील व जिल्ह्यातील 39 हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत उपचार सुरु केले, अशी माहिती अहमदनगर मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली.
महात्मा फुले जनआरोग्य या योजनेमुळे कोरोना रुग्णांना खाजगी हाॅस्पिटल मध्ये होणारा लाखो रुपयांचा खर्च लागणार नाही. या योजने अंतर्गत उपचारा करीता केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक असुन ज्या रुग्णांना श्वसनाचे त्रास तसेच तीव्र लक्षणे असणारे रुग्ण यामध्ये उपचार घेऊ शकतील, असा शासनाचा नियम आहे. त्यामूळे सर्व सामान्य जनतेने कोरोना आजारामुळे मोठ्या खर्चाला घाबरुन न जाता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार करावेत. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने करण्यात आले असुन कोणालाही या योजने अंतर्गत अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या नितीन भुतारे व सचिन डफळ तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले असून पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आभार महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने मानले आहे, असे भुतारे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments