Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एसीबीचा छापा ; विभागीय महसूल अधिकाऱ्याला 10 कोटी रुपयांची लाच घेताना पडकले रंगेहाथ

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
हैदराबाद : – लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी एका जमीन प्रकरणात विभागीय महसूल अधिकाऱ्याला 10 कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पडकले होते. आरोपी आधिकाऱ्याला बालाराजू याला लाच दिल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. तहसीलदारांनी 28 एकर जागेसंबंधी एका प्रकरणात ही लाच घेतल्याचा आरोप आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशीरा करण्यात आली. शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने बालाराजू नागराजू याच्या घरावर छापा टाकून लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईत तहसीलदारांशिवाय महसूल अधिकारी बी साईराज यालाही अटक केली आहे. बी साईराज हा मलकनगिरी जिल्ह्याच्या विभागीय मुख्यालयात कार्यरत आहे. मलकनगिरी हा जिल्हा हैदराबादमधून काही भाग वेगळा करून तयार करण्यात आला आहे. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी लाचखोर तहसीलदारच्या घरावर छाप टाकून रोकड जप्त केली. ही रोकड पाहून अधिकारी देखील चकीत झाले.
सीबीच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादच्या मुख्य व्यावसायिक आणि स्थानिक संकुलनात असलेल्या तहसीलदाराच्या घारावर एकाच वेळी छापे टाकले असून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांगण्या येत आहे. शुक्रवारी रात्रीपासून सरु असलेली ही कारवाई शनिवारी देखील सुरु राहणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन तहसीलदारांवर कारवाई केली होती. या कारवाईत 93 लाख आणि 30 लाख रुपयांची लाच घेताना दोन तहसीलदारांना अटक केली होती.Post a Comment

0 Comments